स्वमग्न प्रौढांसाठी ची जीवन कौशल्य
जगभरात स्वमन मुलांच्या जन्माचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आपल्या भारतातही शंभरात एक स्वमग्न मूल जन्माला येत आहे. याचाच अर्थ काही वर्षात प्रौढ स्वमग्न व्यक्तींचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढणार आहे. अर्थातच त्या बरोबरीने येणाऱ्या समस्याही जाणवणार आहेत. दुर्दैवाने आज तरी आपण समाज म्हणून त्यासाठी पुरेसे तयार नाही आहोत.
स्वमग्न व्यक्ती समाजात संवाद साधण्यात कमी पडते. बऱ्याच वेळा त्यांची भाषेची समज पुरेशी नसते. आजूबाजूच्या व्यक्तींचे वागणे-बोलणे सभोवतालच्या परिस्थितीचे भान मर्यादित असते, बरोबरीने एखादी गोष्ट वारंवार करत राहणे, एकसुरी साचेबद्ध जीवन पद्धतीचा आग्रह, नेहमीच्या संवेदनांना वेगळा प्रतिसाद देणे या सगळ्यातून त्यांचे रोजचे जगणे अवघड बनते. दुर्दैवाने याचा त्यांच्या शालेय शिक्षणावरही प्रतिकूल परिणाम होतो. काही वेळा स्वावलंबन कौशल्यातही मागे पडतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दैनंदिन जीवन कौशल्य विकसित होत नाहीत. त्यामुळे रहदारीचा रस्ता ओलांडणे, दुकानातून वस्तू खरेदी करणे, एखादी गोष्ट योग्य प्रकारे मागता येणे, स्वतःच्या गरजा व्यक्त करणे अशा रोजच्या साध्या गोष्टी अवघड बनतात. स्वमन व्यक्ती समाजाचे रीतीरिवाज, शिष्टाचाराचे नियम नीट समजू शकत नाही. त्यामुळे साध्या धन्यवादापासून स्त्री-पुरुष फरक समजून त्याप्रमाणे वागणे यात स्वमग्न व्यक्ती माने पडतात. खरंतर साधे-सरळ थोडेसे भोळसर असलेल्या स्वमन व्यक्ती त्यामुळे भलत्याच गैरसमजांना सामोरे जातात. त्यांना इतरांच्या भावना समजायला आणि स्वतःच्या भावना व्यक्त करायलाही अवघड जाते त्यामुळेही गोंधळ उडतो.
स्वमन याचा अर्थच स्वतःमध्ये रममाण असलेली मनस्वी व्यक्ती असा आहे त्यामुळे कामाच्या ठिकाणी बॉसच्या ऐकणे, सहकाऱ्यांबरोबर समजून वागणे, दिलेल्या वेळेत नेमून दिलेले काम पूर्ण करणे, काम करण्यात समस्या आल्यास त्या व्यक्त करणे हे सगळेच अवघड बनते. त्यातून मग नोकरी-धंदा आधी मिळत नाही आणि मिळाले तर टिकवता येत नाही यातून स्वमन प्रौढांना अर्थार्जन अवघड बनते.
स्वमन्न प्रौढांच्या बाबतीत अजून एक गुंतागुंत असते ती स्त्री पुरुष संबंध व वैवाहिक आयुष्याची. सर्वसाधारणतः स्वमझता असली तरी वयात येण्याबरोबरचे बदल, मुलींमध्ये मासिक पाळी, स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल निर्माण होणाऱ्या आकर्षण हे सगळे वयानुरूप नॉर्मल घडत असते. प्रश्न येतो त्या अनुषंगाने समाजात वावरताना ! बोलून व्यक्त करण्यात मर्यादा असल्यामुळे स्वमन्न व्यक्ती स्पर्शातून व्यक्त व्हायचा प्रयत्न करतात आणि नको ते गैरसमज निर्माण होतात गंभीर स्वरूपाच्या स्वमन्नतेमध्ये विवाहाचा अर्थ नीट करू शकत नाहीं पण हाय-फंक्शनिंग, अति सौम्य पातळीवरच्या स्वमग्न व्यक्तींचे विवाह यशस्वी होऊ शकतात हे पाश्चात्य संशोधनात लक्षात आले आहे. फक्त त्यांना नियमित समुपदेशनाची गरज असते.
या व अशा अनेक समस्यांच्या पार्श्वभूमीवर आपण स्वमग्न प्रौढांसाठी काय करू शकू याचा विचार करूयात
(१) लवकर निदान व उपचारः सध्या सुदैवाने स्वमझतेचे निदान लवकर होऊ लागले आहे परंतु प्रौढत्वात येणाऱ्या समस्यांचा विचार करून बालवयापासून, कुमार वयात सुद्धा जीवन कौशल्य शिक्षणावर भर देणे कमी पडत आहे. ५० आणि १०० रुपयातला फरक शिकवणे हे गणित पाढे पाठ करण्यापेक्षा जास्त उपयोगाचे आहे! पृथ्वीचा भूगोल शिकवण्यापेक्षा सुरक्षितपणे रस्त्याने जाता येणे महत्वाचे आहे, हे पालकांना शिक्षकांना समजणे अत्यावश्यक आहे. सेवासदन दिलासा संस्थेचे कार्य याच दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे.
(२) समाजमान्य संवाद व वर्तन शिक्षणः स्वमग्न व्यक्तीला समाजाचे नियम (जे खरंतर खूप नाही आहेत) वेळेत व वारंवार प्रशिक्षणातून शिकवले तर त्यांचे जीवन सोपे होईल. चाकोरी व क्रमबद्धतेची आवड हे स्वमन्न मुलांचे अथवा व्यक्तींचे गुणविशेष यासाठी वापरले तर दैनंदिन जीवन सुरळीत चालू शकेल. बरोबरीने समाजात वावरण्यासाठी लागणारे निवडक शिष्टाचार शिकवले व त्या अनुषंगाने विशिष्ट शब्दप्रयोग घोटवून घेतले तर त्यातून त्यांचेच जीवन सोपे होईल.
(३) भावनांचे प्रशिक्षणः खरंतर स्वमन व्यक्ती भावनिक दृष्ट्या सरळ साधी असते पण समाजात वावरताना त्यांना भावनांचे सुद्धा प्रशिक्षण द्यावे लागते. परत एकदा त्यांची दृश्यात्मक स्मरणशक्ती त्यांच्या मदतीला येऊ शकते. चित्रांच्या फोटोंच्या मदतीने चेहऱ्यावरचे हावभाव व त्यानुरूप येणाऱ्या भावना, त्या संदर्भातील शब्द आणि कृर्तीचे प्रशिक्षण दिले तर स्वमग्न व्यक्ती स्वतःला सांभाळून शकतात. काही वेळा या भावनांच्या गोंधळाबरोबर वर्तन समस्या (उदाहरणार्थ राग आरडाओरडा चिडणे रडणे मारणे इत्यादी) निर्माण होऊ शकतात. अशा वेळेस वर्तनोपचार व मर्यादित स्वरूपांचा औषधोपचार गरजेचा असतो.
(४) व्यवसायाभिमुख प्रशिक्षण व प्रत्यक्ष व्यवसाय / नोकरीः याची सुरुवात अगदी १२-१३ वर्षांपासून करावी लागते. स्वमन्न व्यक्ती जरी सामाजिक संवादात, रूढ शिक्षणात मागे पडत असल्या तरी अनेक सेवा क्षेत्रातील कौशल्ये ते आत्मसात करू शकता शकतात. विशेषतः स्वयंपाक, शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, लॉन्ड्री यापासून हॉटेल / हॉस्पिटल मधील सेवा क्षेत्रे आणि हाय फंक्शनिंग प्रकारातील काही स्वमग्न व्यक्ती संगणक क्षेत्रातही काम करू शकतात. पण हे करताना त्यांना कायम मार्गदर्शनाची गरज लागते. साध्या कामातही कुशल आणि स्वमन्न व्यक्तींना समजून घेऊन त्यांच्याकडून काम करून घेण्यातही तज्ञ अशा दुहेरी कौशल्य असणाऱ्या मार्गदर्शकांची खूप कमतरता आहे.
(५) स्वमग्न व्यक्तींचा स्वमदत गटः सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे स्वमन प्रौढांनाही समाजाची मित्रांची कुटुंबाची गरज असते म्हणूनच त्यांना समजून घेणाऱ्यांचा असा स्वमग्न गट हा अत्यावश्यकच! अशा व्यक्तींना भावनिक आधार देणे, त्यांच्या समस्या सोडवणे आणि त्याच वेळेस त्यांना मनोरंजनाची साधन सुविधा उपलब्ध करून देणे ही स्वमन्न गटाची प्रमुख उद्दिष्टे असू शकतात. स्वमन व्यक्तींच्या पालकांनाही आधाराची गरज असते आणि हा आधार अशा प्रकारच्या गटामधून मिळू शकतो.
(६) सामर्थ्य स्वमन्न व्यक्तींचेः स्वमग्न व्यक्तींना यशस्वी व्हायचे असेल तर त्यांची दृश्यात्मक स्मरणशक्ती, उत्कृष्ट पाठांतर क्षमता, चाकोरीबद्ध जीवनशैली, सोपी सूचना व त्वरित कृती आणि अंगभूत विशेष कौशल्ये आपण लक्षात ठेवली आणि त्यांना समाजात मर्यादित का होईना; पण समावेशाची संधी मिळाली तर त्यांचे आयुष्य आनंदी व उपयुक्त होऊ शकेल.

डॉ. सुनील गोडबोले
बालविकास तज्ञ
www.chiranjeevgodbole.com
