इयत्ता १० वी परीक्षेसाठी महत्वाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ व भाग २ परीक्षेला जाण्यापूर्वी हे नक्की करा..

इयत्ता १० वी परीक्षेसाठी महत्वाचे

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ व भाग २

परीक्षेला जाण्यापूर्वी हे नक्की करा..

  • महत्वाच्या संकल्पना पूर्ण व काळजीपूर्वक वाचा.
  • सर्व नियम व व्याख्या नीट वाचा ,त्यातील महत्वाचे व वैज्ञानिक शब्द लिहिण्याचा सराव करा.
  • नामनिर्देशित केलेल्या आकृत्या पुन्हा एकदा नीट ,काळजीपूर्वक अभ्यासा.
  • आकृत्यांशी संबंधित असलेली स्पष्टीकरणे नीट वाचा.
  • शास्त्रीय कारणे वाचा,त्यांचे शास्त्रीय मुद्दे व शास्त्रीय शब्द नीट अभ्यासा.
  • सर्व सूत्र एकदा न पाहता लिहून काढा.
  • सूत्रातील चिन्हांचे अर्थ वाचा.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मध्ये भौतिकशास्त्र या भागातील म्हणजेच प्रकरण १,४,५,६,७ व अवकाश मोहिमा यातील पुस्तकात सोडवून दाखविलेली उदाहरणे ,स्वाध्यायातील सोपी उदाहरणे नक्की वाचा, सोडवून पाहा.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मध्ये रसायनशास्त्र या भागासाठी प्रकरण २ मधील आधुनिक आवर्तसारणी नीट वाचा. आधुनिक आवर्तसारणीमधील पहिली २० मूलद्रव्य , त्यांचे अणूअंक, खंड,आवर्त  ,इलेक्ट्रॉन संरूपण तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहेत.
  • रासायनिक समीकरणाचे प्रकार, रासायनिक समीकरणे आणि रासायनिक समीकरण संतुलित करणे हा भाग नक्की वाचा.
  • रचनासूत्रे,त्यांची आय.यु.पी.ए.सी.नावे, क्रियात्मक गट हा भाग नक्की वाचा .
  • पाठ्यपुस्तकात विविध कृती दिल्या आहेत त्या नीट वाचा आणि समजून घ्या.
  • संकल्पनांचे उपयोजन योग्य पद्धतीने ,काळजीपूर्वक अभ्यासा.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ मध्ये प्रकरण ४,५,९,१० मधील बऱ्याच संकल्पना दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत ,त्यांचा दैनंदिन जीवनातील उदाहरणांसोबत संबंध जोडून उपयोजनात्मक पातळीवर अभ्यास करा व विचार करा.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ मध्ये प्रकरण १,२,३,६,७,८ यातील सोप्या आकृत्या काढून पहा व इतर आकृत्या व त्यांचे स्पष्टीकरण नीट अभ्यासा.
  • व्यवस्थित उमटणारे ,पूर्ण शाई असणारे पेन(निळ्या,किंवा काळ्या रंगाचे),योग्य टोक असलेली पेन्सिल, खोडरबर, पट्टी,hall तिकीट आधीच तयार ठेवा.
  • रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा .पूर्ण विश्रांती घ्या.
  • बाहेरचे खाणे टाळा .घरचे ताजे व पौष्टिक अन्न खा.

कृतीपत्रिका सोडविताना हे महत्वाचे ..

  • उत्तर पत्रिकेला बारकोड स्टीकर ,होलोक्राफ्ट नीट चिकटवा.
  • प्रश्न शांतपणे, काळजीपूर्वक, नीट वाचा आणि समजून घ्या, नंतरच उत्तर लिहायला सुरुवात करा.
  • आकृती शास्त्रीयदृष्ट्या योग्य,अचूक व नामनिर्देशित असलेली काढा.
  • नवीन प्रश्न नवीन पानावर सुरु करा.
  • प्रश्न क्रमांक नीट टाका.
  • शक्यतोवर क्रमवार प्रश्न सोडवा, उत्तरे लिहिताना प्रश्नांचा क्रम बदलू नका.
  • अनिवार्य प्रश्न आधी सोडवा.
  • आवश्यक तेवढे मुद्देसूद स्पष्टीकरण लिहा.उत्तराच्या स्पष्टीकरणास आवश्यकता असल्यास नामनिर्देशित आकृती काढा.
  • उदाहरण सोडविताना दिलेली माहिती,योग्य सूत्र,आवश्यक आकडेमोड,पूर्ण वाक्यात उत्त्तर व उत्तरला योग्य एकक द्या.
  • एखाद्या प्रश्नाचे उत्तर रद्द करायचे असल्यास ते पूर्ण खोडा व पुन्हा योग्य प्रश्न क्रमांक टाकून योग्य उत्तर लिहा.
  • खोडलेल्या भागावर over writing करू नका.
  • पुरेसा वेळ असल्यास ,उत्तरामध्ये महत्त्वाचे शब्द अधोरेखित करा.
  • सोडविलेले प्रश्न पुन्हा एकदा नीट तपासून पहा.
  •  त्यानंतरच वेळ उरला तर वैकल्पिक (ऑप्शनल) प्रश्न सोडवा.
  • कच्च्या कामासाठी शेवटचे पान वापरा.
  • पुरवणी हवी असल्यास अर्धे पान शिल्लक असतानाच पुरवणी मागा.पुरवणीवर रोल नंबर ,पुरवणी क्र.टाका व लिहिण्यास सुरुवात करा.
  • Warning bell झाल्यावर पुरवणी बांधा.मुख्य पानावर पुरवण्यांची संख्या लिहा.

 

कृतीपत्रिका सोडविताना वेळेचे नियोजन असे करा…..

प्रश्न क्रमांक

प्रश्न सोडविण्यासाठी द्यावयाचा वेळ

१.अ

१० मि.

१.ब

१० मि .

२.अ

१० मि.

२.ब

२० मि.

३.

५०/५५ मि.

४.

१०/१५ मि.

कृती उत्तर पत्रिका तपासणी

शेवटचे शिल्लक  ५ ते १० मिनिट

 

शिल्लक राहिलेला वेळ उत्तरपत्रिका तपासण्यासाठी वापरा.यात प्रथम बहुपर्यायी प्रश्न१.अ,

वस्तुनिष्ठ प्रश्न-१.ब तपासा.नामनिर्देशित आकृत्या तपासा.शास्त्रीय कारणे-२.अ  व इतर प्रश्न तपासा.

डॉ.प्राची राहुल चौधरी .

सेवासदन पुणे

सदस्य-विज्ञान पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ  ,बालभारती पुणे

 

Scroll to Top