संतुलित आहार निरोगी जीवनासाठी गुरूकिल्ली
योग्य खाणे हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. चांगला आहार केवळ तुमचे शरीर मजबूत करत नाही तर हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि काही प्रकारचे कर्करोग टाळण्यास देखील मदत करतो. संतुलित आहार ऊर्जा उत्पादन, रक्तपेशी निर्मिती आणि स्नायूंच्या कार्यासाठी जरुरीचा आहे.
पोषक तत्वांनी भरपूर आहाराबरोबरच, दररोज भरपूर पाणी पिणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. आहारामध्ये कर्बोदकं, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वं व क्षार यांचा योग्य वापर हवा. या बरोबर स्निग्ध पदार्थ, साखर किंवा मीठ जास्त असलेले पदार्थ आणि पेये प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये कमी प्रमाणात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. असा संतुलित आहार सर्वाप्रमाणे तो दिव्यांग व्यक्तींसाठीही महत्वाचा आहे. आवश्यकतेनुसार दिव्यांग व्यक्तींना खाण्याच्या सवर्थीमध्ये काही बदल करावे लागतात.
जसे, रक्तातील साखर संतुलित करणे
– ग्लूटेन आणि दुग्धजन्य पदार्थांसारख्या अन्न ऍलर्जी ओळखणे
– पोषक तत्वांची कमतरता दूर करणे
– अत्यावश्यक स्निग्ध पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन सुनिश्चित करणे, विशेषतः ओमेगा ३ फॅटी ऍसिडस्
– दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. ते दिव्यांग व्यक्तींच्या आहारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. प्रथिने, ऊर्तीची वाढ आणि दुरुस्ती करण्यास मदत करतात. प्रत्येक ग्लास दुधात अंदाजे ८ ग्रॅम प्रथिने मिळतात. तसेच यातील कॅल्शियम, मजबूत हाडे आणि दातांसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि हे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करते. ज्याना दुग्धजन्य पदार्थांची अन्न ऍलर्जी आहे अशा व्यक्तिने हे घेणे टाळणे गरजेचे आहे.
– ग्लूटेन अन्न ऍलर्जी असल्यास गहू आणि मैदयापासून बनवलेले सर्व पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कुपोषण रोखण्यासाठी थोडे थोडे पोषक अन्न, वारंवार जेवणाद्वारे घेणे योग्य ठरेल. ज्यायोगे पुरेशा प्रमाणात कॅलरी आणि प्रथिनांचे सेवन सुनिश्चित करणे शक्य आहे. प्रत्येक जेवणात प्रथिनेयुक्त अन्न समाविष्ट करण्याचा आणि दररोज फुल-क्रीम दूध पिण्याचा फायदा होतो. फळे आणि भाज्या हे निरोगी खाण्याचा एक मोठा भाग आहे आणि प्रत्येकासाठी हे खरे आहे. यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर, बी जीवनसत्त्वे, फोलेट, लोह आणि मॅग्नेशियम भरलेले आहेत, जे सर्व आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
दिव्यांग व्यक्तींना बऱ्याच वेळा अनेक पचनाच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. तुमचे अन्न चघळण्यास आणि मिळण्यास सोपे आहे याची खात्री करावी आणि विविध पोत आणि स्वादांसह प्रयोग करावा.
पचनाच्या तक्रारी कमी होऊन पचन सुधारण्यासाठी खालील उपाय करावेत
– अन्न नीट चावून खावे.
हळू हळू खावे.
– जेवणाचे ताट लहान घ्यावे.
आपण खाऊ शकू त्यापेक्षा थोडे कमी वाढून घ्यावे.
– लहान घास घ्यावेत.
– एका जागी बसून खावे.
– आहारात विविधता आणावी.
– धान्य, भरपूर फळे, भाजी अशा तंतुमय पदार्थांचा समावेश असावा.
– ताक, दही, आंबवलेले पदार्थ घ्यावेत.
तुमचे अन्न योग्य प्रकारे कसे चर्वण करावे
– प्रत्येक घास सुमारे ३२ वेळा चाउन खा.
– हळूहळू आणि स्थिरपणे चर्वण करा.
– तुमच्या तोंडातील अन्न द्रवरूप होईपर्यंत चघळत रहा.
– अन्नाचा दुसरा घास घेण्यापूर्वी पहिला घास पूर्णपणे चघळणे आणि मिळणे पूर्ण करा
– आपण तोंडातील घारा मिळत नाही तोपर्यंत पातळ पदार्थ पिण्याची प्रतीक्षा करा.
तुमच्या अन्नातील कॅलरी वाढवण्याचे काही उपाय :
– कमी वजन असल्यास पूर्ण चरबीयुक्त उत्पादने निवडा
– फुल-क्रीम दुधात २-४ चमचे स्किम्ड मिल्क पावडर घाला
– स्वयंपाक करताना अतिरिक्त चरबी / तेल, सँडविचमध्ये लोणी /सोड वापरा
– तृणधान्ये किंवा दलिया या बरोबर गोड पदार्थ, साखर / सिरप /मध / नट / बटर / चॉकलेटचा समावेश करा
– क्रीम/चीज/तेलासह सूप किंवा सॉस वाढवा
– जेवणादरम्यान स्नॅक्स समाविष्ट करा, जसे की दही, चीज आणि बिस्किटे
– योग्य पौष्टिक पूरक आहारासाठी तुमच्या आहारतज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Brief Biodata – Sucheta Limaye
- A qualified Consultant Clinical Dietitian working towards making people healthier for last 25 yrs. Graduated as bachelor of home science in 1994 and completed masters in Dietetics in 2004 from PUNE UNIVERSITY.
- ESPEN Lifelong Learning Certificate Courses in Clinical Nutrition in year 2019-2021
- Life member of Indian Dietetic Association, India Association for Parenteral and Enteral Nutrition, Geriatric Society of India
- Currently working as Hon. Clinical Dietician at Deenanath Mangeshkar Hospital and a Visiting consultant at Joshi Hospital, Ratna Hospital, MJM Hospital, Sanjeevan Hospital and Lokamanya hospital (S.B.Road)
- Onco Nutrition expert at Avinash Cancer Clinic.
- Vast experience in counselling and guiding cancer patients for keeping them well-nourished throughout their therapy.
- Passionate about educating and inspiring people to improve their health and achieve a healthy lifestyle.
- As a clinical dietitian counselling and writing diet plans for patients with special needs as diabetic diets, renal diets, etc.
- Have been closely working with geriatric patients in opd as well as speaker and guide with many ‘Jesth Nagarik Sangh’.
- Certified Nutrigenomics Consultant
- Organised many CNE’S & awareness programmes as Past Hon. Chapter Secretary, IAPEN, Pune chapter and through Rotary Club of Poona Weast.
- Preface to many cook books published by Sakal Publication
- Participated in a TV show for role of nutrition in reducing exam stress.
- Author of booklet ‘Aayushyachi Pahili Payari -Aahar Vichar’

Mrs. Sucheta Vijay Limaye.
M.Sc. Health Science (Dietetics)
